सफेद चिप्पी' महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषितराज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

           मुंबई दि. 7 : या शासनासाठी विकास म्हणजे केवळ बांधकामे नसून वनवन्यजीव आणि जंगल संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे राज्य वन्यजीव मंडळाच्या यापुढील बैठकीत सादर होणाऱ्या प्रस्तावासाठी यापुढे ड्रोन सर्व्हे बंधनकारक राहीलज्या विभागाचा प्रस्ताव असेल त्या विभागाने त्या प्रकल्पाचे छायाचित्र सादर करणेप्रकल्पाची वस्तुस्थितीजन्य माहिती देणे आणि त्याचा पर्यावरणीय परिणाम विशद करणे आवश्यक राहीलअशाच प्रस्तावांचा पुढील बैठकीत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

            आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस वनमंत्री संजय राठोडपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेराज्यमंत्री दत्तात्रय भरणेआमदार धीरज देशमुख यांच्यासह राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्यवन विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सफेद चिप्पी राज्य कांदळवन वृक्ष घोषित

            आज राज्य वन्यजीव मंडळाची 15 वी बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत 'सफेद चिप्पी' ( sonneratia alba) या कांदळवन वृक्षाला महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

अभ्यासगटाची नियुक्ती

            याच बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या स्थलांतरणाच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. हा विषय अतिशय संवेदनशीलपणे आणि काळजीपूर्वक हाताळला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्याची सूचनाही दिली. मानव- वन्यजीव सहजीवन विकसित करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास केला जावा,  यासाठी एक परिषद घेऊन एकत्रित विचारातून हा मार्ग निश्चित करावा असेही सांगितले.

पर्यावरणाचे नुकसान करून प्रकल्प राबवू नयेत

        प्रस्तावित पश्चिम घाट  पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राकडे तत्वत: सहमती दर्शविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  राखीव वन आणि जंगले  यासंदर्भात प्रस्ताव सादर करतांनाएखाद्या क्षेत्राला राखीव क्षेत्र घोषित करतांना प्रकल्प आणि जनमत मॅच होते का याचा देखील अभ्यास केला जावा. पर्यावरणाची किंमत मोजूनजंगलाचे नुकसान करून प्रकल्प राबविण्याचे कोणेतेही सोपे मार्ग निवडण्यात येऊ नयेत म्हणूनच जेंव्हा अकोला-खांडवा मिटर गेज रेल्वेलाईनचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याच प्रस्ताव आला तेंव्हा मेळघाट मधून जाणाऱ्या या प्रकल्पासाठी पर्यायी मार्ग बदलण्याचे राज्याचे मत केंद्र शासनाला कळविण्यात आले. हा पर्यायी मार्ग निवडल्यास  वाघ व वन्यजीवांचे सरंक्षण तर होईलच त्याचबरोबर  बरीच नागरी वस्ती कव्हर होईल आणि त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळू शकेल असेही ते म्हणाले.

समर्थनासह मुख्यमंत्र्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाने केला मंजूर

            मेळघाट व्याघ्र राखीव मधून जाणाऱ्या अकोला ते खांडवा या मीटरगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात परिवर्तन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाला आपले मत कळवले होते. त्यांच्या या मताचे समर्थन करतांना राज्य वन्यजीव मंडळाच्या सर्व सदस्यांनी आज एकमुखाने मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी याचपद्धतीने नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रुपांतर करतांना तो किती जंगलाला प्रभावित करतोतिथे एलिव्हेटेड ट्रेन करणे शक्य आहे कायाचा विचार करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

            महाराष्ट्रात वाघांची जपणूक होत आहे पण त्याचबरोबर जलचरांकडेही वन विभाग लक्ष देत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात सुंदर वनसंपदेप्रमाणे समृद्ध जलसृष्टी ही आहे. आपण त्याकडे कसे पहातो हे महत्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सागरतटावर कांदळवने देत असलेल्या नैसर्गिक सुरक्षेचा अभ्यास करण्याची सुचना दिली.

वन्यजीव उपचार केंद्रे तातडीने सुरु करावीत

     राज्याचं जंगल वाढणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले कीमुंबईतील फ्लेमिंगो ठाणे क्रिक अभयारण्याचे क्षेत्रही आपल्याला वाढवायचे आहे. कासवांचे जिथे जिथे संरक्षण करता येईल तिथे कासव संवर्धन प्रकल्प राबविण्यास मंजुरी देण्याबाबत ही त्यांनी सांगितले. राज्यात वन विभागाच्या 11 सर्कलमध्ये जिथे वन्यजीव उपचार केंद्रे आहेत ते सोडून अन्यत्र असे संक्रमण उपचार केंद्र तातडीने सुरु करावीत अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वन्यजीव प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध करून घेण्याबाबतचे पत्र रद्द  करावेअसेही ते म्हणाले.

आंग्रीय पठार नियुक्त क्षेत्र घोषित करण्याची शिफारस

        आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मेरिटाईम झोन्स ॲक्ट अंतर्गत आंग्रीया पठाराला  नियुक्त क्षेत्र म्हणून अधिसुचित करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे शिफारस करण्यास मान्यता देण्यात आली.   महाराष्ट्र राज्यातील भारतीय जलक्षेत्रातील अरबी समुद्रीय हम्पबॅक व्हेल  च्या पुनरुज्जीवन  प्रकल्पातील संशोधन कार्यक्रमासह राखीव वन क्षेत्रात करावयाच्या विविध कामांची शिफारस करून ती केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे निश्चित करण्यात आले.

            वन्यजीव संवर्धनातील ठळक उपलब्धींची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यामध्ये नांदुर मध्यमेश्वर अभयारण्याला रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आल्याचे व लोणार सरोवरासाठी  असे प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तिलारी संवर्धन राखीव ची मान्यताभारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांच्या सहयोगाने हाती घेतलेले दीर्घकालीन संशोधन,जलद बचाव पथकनागपुरचे तात्पुरते उपचार केंद्रसंरक्षित क्षेत्रातून गावांचे झालेले पुनर्वसनकांदळवन उपजीविका अभियानाची यशस्विता याचा समावेश होता.

            बैठकीत मोगरकासा,  महेंद्राचंदगड पटणे कन्झरवेशन रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर  सकारात्मक निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

        विभागाची पुनर्रचना करणे आवश्यक असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.  त्यांनी राज्यात वन्यजीवांच्या उपचारासाठी उपचार केंद्रे वाढवून देण्यासंदर्भात केंद्र शासनाला पत्र पाठवण्याची मागणीही केली.

        राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनासाठी जिथे शक्य  असेल तिथे आदिवासी विभागाचा निधी घेण्यासाठीच्या प्रस्तावाला संबधित विभागाची मान्यता घेऊन यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे वन विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. ते म्हणाले कीमहाराष्ट्र वन्यजीव संवर्धन निधी प्रस्ताव शासनाला प्राप्त झाला असून नियमात आवश्यक सुधारणा करून हा फंड स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे असे ही ते म्हणाले.

Post a comment

0 Comments