डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून नवीन पुतळा बसवावा फुलंब्री नगराध्यक्षांना निवेदन


 

फुलंब्री -  शहरात  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करून नवीन पुतळा बसवावा  या मागणीचे निवेदन फुलंब्री नगराध्यक्षांना देण्यात आले आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे.सदर स्मारक मुख्य रस्त्यावर असल्याने देशभरातुन लाखो भारतीय बांधव आपल्या शहरातुन जातात त्यामुळे त्यांना बाबासाहेबांचे प्रेरणादायी स्मारक बघून बाबासाहेबांच्या जिवंत इतिहासाची आठवण होते ही आम्हा फुलंब्रीकरांसाठी अभिमानाची बाब असून फुले.शाहू आंबेडकरी व शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची बाब आहे 
फुलंब्री येथील बाबासाहेबांचे स्मारक अतिशय जुने व समाजबांधवांच्या संर्घषातून तयार झाले आहे. १९८० चे हे स्मारक आहे.त्यामुळे बाबासाहेबांची मुर्ती अतिशय जीर्ण झाली आहे तसेच मुर्तीच्या पायाला तडे गेले आहेत त्यामुळे भविष्यात सदर पुतळ्याला हाती पोहचू शकते  त्यामुळे बाबासाहेबांचा पुतळा बदलने काळाची गरज आहे.
आपण फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहात त्यामुळे आपल्या हातुन या स्मारकाचा विकास व्हावा ही आमची प्रामाणिक इच्छा आहे.तरी आपण नगरपंचायतीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या स्मारकाचा विकास व नवीन पंचधातुचा पुतळा उभा करुन या ऐतिहासिक क्रांतीचे साक्षीदार व्हावे असे या निवेदनात म्हटले आहे
   हे निवेदन नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांना सोमवार दि. १०आॅगष्ट रोजी देण्यात आले यावेळी राजु प्रधान,संजय मोरे,रमेश गंगावणे,जे पी शेजवळ,संजय प्रधान,अजय गंगावणे. डॉ के बी हिवराळे भगवान गंगावणे,किशोर गंगावणे,बाळु गंगावणे, विशाल गंगावणे किरण गंगावणे,सुरेश गंगावणे,रवी साठे, बाबासाहेब गंगावणे दिलीप गंगावणे, साहेबराव गंगावणे,संजय हिवराळे, साहेबराव बनकर शामराव हिवराळे सुरेश प्रधान निलेस दनके   मनोहर प्रधान,आकाश गंगावणे,सुमीत प्रधान आदी असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments