गोविंदा सणावर कोरोनाचे सावट प्रशासनाच्या अटी मूळे युवा वर्गात नाराजी


(रामचंद्र घोड्मोडे श्रीवर्धन)

देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणु मुळे यंदा सर्व सण साधेपणाने साजरे होत आहेत.  कोरोनामुळे यंदा  पारंपारिक दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषावरही विरजन पडले आहे. मानवी मनोरे रचून उंचावर बांधलेली हंडी फोडण्यावर व वाद्य वाजवायला  बंदी आल्याने दहीकाल्याच्या महिनाभर आधी सुरु होणाऱ्या गोविंदापथकाच्या सरावाला ही यंदा ब्रेक लागला आहे. दहिकाला हा हिंदुचा पारंपारिक सण आहे. श्रावण वद्य अष्टमीला हा सण संपुर्ण देशात साजरा केला जातो. उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी गोविंदांना आठ ते दहा थराचे मानवी मनोरे रचावे लागत असल्याने दहीकाल्याच्या सुमारे महिनाभर आधीच गोविंदा पथकांना कसून सराव करावा लागतो. मात्र यावर्षीच्या दहिकाल्यावर कोरोनाचे गडद सावट असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील एकाही गोविंदापथकाने सरावाला सुरवात केलेली नाही. श्रीवर्धन तालुक्यात दहीकाल्याच्या सुमारे एक महिना आधीपासून कसून सराव केल्यानंतर ही पथके प्रत्यक्ष दहीकाल्याच्या दिवशी तालुक्यातील उंचावर बांधलेल्या हंड्या फोडतात.  सात थरापर्यंत मानवी मनोरे रचून दहीहंडया फोडतात. मात्र यावर्षी यातील एकाही गोविंदा पथकाने सरावाला सुरवात केलेली नाही.श्रीवर्धन तहसिलदार यानी शांतता कमेटीची मिटींग घेऊन सण कसे साजरे करावेत याबाबत सूचना केल्या आहेत़

Post a comment

0 Comments