फुलंब्री तालुक्यात सिरो सर्व्ह करण्यात येणार फुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे)

फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आळंद अंतर्गत मौजे उमरावती येथील 16 ,प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी अंतर्गत मौजे गणोरी 34 व ग्रामीण रुग्णालय फुलंब्री अंतर्गत फुलंब्री शहरातील  46 जणांची भारत सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे गणोरी व उमरावती या ठिकाणी  दिनांक 19 वार बुधवार व फुलंब्री येथील दिनांक 20 वार गुरुवार रोजी तपासणी करण्यात येणार आहे.


जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ डॉक्टर, डॉ. मुजीब सय्यद, 
जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. उल्हास गंडाळ
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर राव कुलकर्णी
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोंदवले साहेब
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे तज्ञ प्राध्यापक डॉक्टर यांनी निवड झालेल्या गावांच्या वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रशिक्षण घेतले. आणि मार्गदर्शन केले.

या सिरो सर्व्हे साठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ उल्हास गंडाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न भाले व प्राथमिक आरोग्य केंद्र आळंद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रविराज पवार व प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश साबळे व ग्रामीण रुग्णालय फुलंब्री येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ अरविंद हरबडे यांनी केले आहे.

या सिरो सर्व्हेक्षण मध्ये आपल्याला आपल्या गावात कोरोना आजारासाठी किती टक्के  नागरिकांची  रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे हे कळणार आहे.तसेच ही तपासणी केल्यानंतर क्वॉरनटाईन किंवा हॉस्पिटलमध्ये भरती केले जाणार नाही,सिरो सर्व्ह मध्ये 18 वर्षी वरील पुरुष, महिला यांची निवड करण्यात येणार आहे.या सर्व्ह च्या निकषांवरून आपल्या येथील लॉकडाउन केंव्हा इतर बंधने केव्हा शिथिल करता येईल याबाबत याबाबत निर्णय घेता येईल. पुढील काळात काय काय प्रतिबंधक उपाययोजना करता येतील या बाबत महत्वपूर्ण माहिती मिळेल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न भाले यांनी दिली आहे. 
 हे सिरो सर्व्ह यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती केली आहे.

Post a comment

0 Comments