पैठण युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत कृषीमंत्री यांना निवेदन


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:— दि.12/2020 रोजी
बुधवारी पैठण युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना पैठण तालुक्यातील ऊस पिकावर पडलेल्या काळा व पांढरा लोकरी मावा या  रोगा संदर्भात पाहणी करून तसेच पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. तसेच तालुका कृषी विभागाच्या वतीने आतापर्यंत याबाबत कुठल्याही उपाय योजना केल्या नाहीत, किंवा प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्यांना यासंदर्भात माहीती दिली नाही, कोणत्याही गावाना भेट दिली नाही, ज्यावेळी ऊस पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव वाढत होता त्यावेळी कृषी विभागाने उपाय योजना करणे गरजेचे होते. पण कोणीही या कडे लक्ष न दिल्याने या रोगाने ऊस पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे कृषी विभागाच्या संबंधीत आधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी. असे निवेदन पैठण तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पैठण तहसील कार्यालयाचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्फत कृषी मंत्री दादा भुसे यांना देण्यात आले.
यावेळी पैठण तालुका युवक अध्यक्ष किशोर पाटील दसपुते, अनिल मगरे शहरअध्यक्ष योगेश शिपनकर, संभाजी काटे, बबरू कदम, किरण जाधव, रविंद्र आम्ले, सजन भोसले, जिजा औटे व इतर शेतकरी उपस्थित होते....

Post a comment

0 Comments