कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून दोघांना भोसकलेदोघांचीही प्रकृती गंभीर


औरंगाबाद : कचरा टाकल्याच्या कारणावरून महिलेसह दोघांना आठ जणांनी लाथाबुक्या तसेच लाकडी दांड्याने गंभीर मारहाण केली. आरोपींनी पोटात चाकू भोसकून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजेदरम्यान रहेमानिया कॉलनीत घडली. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध जिन्सी पोलीस घेत आहेत. 

फईमुद्दीन शेख (३०), शेख नईम (रा. रहेमानिया कॉलनी, गल्ली नं. १२), अशी जखमींची  नावे आहेत. कचरा टाकण्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले.  शेख फईमुद्दीन व शेख नईम यास शेख सय्यद महेमूद सय्यद अमीर (५०), सय्यद अमीर सय्यद महेमूद (२९), सय्यद जावेद सय्याद महेमूद (२६), इम्रान (२७) व अन्य चार महिला, अशा आठ जणांनी मिळून  शेख परवीन फईमुद्दीन, तिचा पती आणि दिराला लाकडी दांड्याने गंभीर मारहाण केली. रागाच्या भरात फईमुद्दीन व नईम या दोघांच्या पोटावर चाकूने वार केले. दोघांनाही जखमी अवस्थेत शासकीय दवाखान्यात नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी दाखल केले. 

दोघांचीही प्रकृती गंभीर असून, याप्रकरणी शेख परवीन फईमुद्दीन यांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून, जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते अधिक तपास करीत आहेत

Post a comment

0 Comments