वैजापूर( प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :
यंदा कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांंचे पालन करून मंडळानी
गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन औरंगाबाद ग्रामिण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी वैजापूर येथील पंचायत समिती सभागृहात ता.१९ रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले. बैठकीला प्रभारी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, तहसीलदार निखिल धुळधर, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपनगराध्यक्ष साबेरखान, बाळासाहेब संचेती, राजुसिंग राजपूत, विशाल संचेती,संजय घुगे, विजय भोटकर
यांच्यासह नगरसेवक, शांतता समिती सदस्य व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी केले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी बैठकीला संबोधित करताना यंदाचा गणेशोत्सव शासनाने आखून दिलेल्या नियमांंत साजरा करण्याचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगितले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव सर्वांंनी कायद्याच्या व नियमांंच्या आधीन राहून साजरा करावा. याशिवाय
0 Comments