रोहित जानराव च्या दहावीच्या यशाची कहाणीमेंढपाळाचा मुलगा रोहित शाळेतून पहिल्या पाच मध्येवैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

नुकताच दहावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लागला व रोहित जानराव हा सर्वांच्या कौतुकाचा व शुभेच्छा यांचा धनी बनला.दहावीमध्ये 79.40 टक्के गुण घेऊन विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होत रोहितने सिद्ध केले की आता राजा चा मुलगा राजा नाही बनणार तर जो हकदार आहे तो राजा बनणार. खंडाळा येथील जिल्हा परिषदेच्या प्रशालेत रोहितचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला.वडिल सुभाष जानराव हे मेंढपाळ असताना सुद्धा शिक्षणाबद्दल जागरूक होते.आपल्या मुलांनी शिकावं , मोठे व्हावे,स्वतःच्या पायावर उभे राहावे व समाजामध्ये नाव मोठे करावं  हा एकमेव ध्यास मनी ठेऊन त्यांनी आपल्या मुलांना शाळेत घातले.शांत स्वभाव असलेला अन कुणाचेही मन बोलताना सहज जिंकून घेणारा रोहितचा हरहुन्नरी स्वभाव सर्वांनाच परिचित होता.तीन किलोमीटर वरून रोज शाळेत पायी यायचे व शाळेतून सुटल्यावर घरी पायी जायचे असा रोहितचा सहा किलोमीटर चा एकूण दिनक्रम ठरलेला.पावसाळ्यात पावसात भिजत,पावसाचा आंनद घेत रोहित ज्ञान मिळवण्यासाठी शाळेत जात होता आणि सुरू झाला रोहितचा दहावीचा शैक्षणिक प्रवास. या शैक्षणिक प्रवासामध्ये रोहितला शाळेतील मुख्याध्यापक ई बी गवळी,शिक्षक
बर्डे एस.ए, खेडकर ई.के, दंडगव्हाळ पी.एच., भालेराव बी.एस, अशोक दारवंटे,इद्रिस मोगल, आसाराम जाधव,श्रीम.कुमावत एम डी, श्रीम.गवारे के एस., श्रीम.पवार जी.बी.,श्रीमती भुजबळ आर.एस.,डी ए.बहाळस्कर यांचे तर मार्गदर्शक राहुल त्रिभुवन यांचेही रोहितला प्रमुख मार्गदर्शन लाभले.दहावीचा अभ्यास करताना रोज सकाळी लवकर उठून अभ्यास करणे, विषय व घटक अवघड असल्यास आपल्या मार्गदर्शक शिक्षक यांच्याकडून समजावून घेणे.दिलेला अभ्यास करण्यासाठी तर कधीकधी आखारावरच पुस्तके घेऊन जात अभ्यास करायचा.परिस्थिती ची जाणिव आणि परिस्थिती मुळे वडिलांचे राहिलेले अर्धवट स्वप्न अंगी बाळगून रोहित त्याचा अभ्यास करत होता.योग्य मार्गदर्शन व सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची शिक्षणाबद्दल ची महत्वकांक्षा व जिद्द यामुळे रोहितने धनगर समाजामध्ये,गावांमध्ये वडिलांची मान उंचावेल अशी भूमिका ठेवत पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळवला.त्याच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने शिक्षक अशोक दारवंटे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव,मामा गणेश ढगे, प्रगती करिअर अकॅडमी चे मार्गदर्शक राहुल त्रिभुवन यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.Post a comment

0 Comments