बिरवाडी ग्रामपंचायती च्या लेखी आश्वासनानंतर सचिन बागड यांचे आमरण उपोषण स्थगित


रायगड  (सुरेश शिंदे )
महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱया बिरवाडी ग्रामपंचायतीकडून मागणी अर्जावरून व माहिती अधिकार अर्जानुसार माहिती मिळत नसल्याने 15 ऑगस्ट2020  स्वातंत्र्यदिनी सकाळी 11:30 वाजता  सचिन बागडे  यांनी सुरू  केलेले आमरण उपोषण ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे 
उपोषण करते सचिन बागडे यांना बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार दहा दिवसात माहिती उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली .यावेळी बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्रीराम दामले संतोष तार महाड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ,  श्री.धनंजय देशमुख (सरचिटणीस :- रायगड जिल्हा काँग्रेस)
श्री. राजेंद्र कोरपे (अध्यक्ष :- महाड तालुका काँग्रेस) बिरवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरअध्यक्ष विलास शिंदे , काँग्रेस पक्षाचे अनिल येरूणकर, शिवाजी चिनके, ,अनंत पवार, प्रमोद साठे, केदार धारिया, चंद्रकांत सुतार, संकेश कदम, मंगेश खामकर, ज्ञानेश्वर खामकर,संकेत कांबळे, विश्वास गुरव, बाळा खराडे, सागर गांधी, सामाजिक कार्यकर्ते अजित कदम ,डीके ग्रुप मित्र मंडळाचे उपाध्यक्ष अतित पवार ,व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱी उपस्थित होते .
सचिन बागडे यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना दिलेले लेखी निवेदनामध्ये मागणी अर्जावरून व माहिती अधिकार अर्जानुसार माहिती न दिल्याबाबत संदर्भ क्रमांक एक 20 जून 2020 व 20 जून 2020 तसेच 29 जून 2020 चे माहिती मागणी अर्ज ,यापूर्वी माहिती अधिकार अर्ज 6 मार्च 2020 चे एकून 13 अर्जानुसार माहिती मिळण्याबाबतचे अर्ज केले होते मात्र माहिती उपलब्ध झालेली नाही त्याचप्रमाणे बिरवाडी ग्रामपंचा धाडीतील व एमआयडीसी महाड कार्यक्षेत्रातील प्रीसिजन फास्टनर्स प्रा. लि. ग्रामपंचायत दप्तरी घर नंबर 892, व इंटरनॅशनल होम टॅक्स प्रा. लि .पूर्वीची त्रिंबक कंपनी ग्रामपंचायत घर नंबर या दोन्ही कंपनीकडून बिरवाडी ग्रामपंचायतीला करापोटी  अंदाजी रक्कम 10465276 /-अक्षरी रुपये एक कोटी सेहेचाळीस लाख पाच हजार दोनशे 76एवढी रक्कम येणे बाकी असताना ग्रामपंचायतीचा नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करून मनमानीपणे बेकायदेशीर रित्या सदर कंपनीच्या येणे असलेल्या कराच्या रकमेला माफीचे अंशदान दिले असल्याचे समजते याबाबत ग्रामपंचायतीच्या कोणत्या नियमानुसार सदर कंपनीच्या कराच्या रकमेला माफीच्या अंशदान दिले त्या मासिक सभा ठरावाची नकल सदर कंपनीची मागणी डिमांडची प्रत व नमुना नंबर 10 घरपट्टी पावती नक्कल इत्यादी माहिती मागणी केली असता ग्रामपंचायतीकडून माहिती उपलब्ध झालेली नाही असे सचिन बागडे यांनी आपले लेखी निवेदनात नमूद करताना बडय़ा कारखान्यांच्या  घरपट्टी कराच्या रकमेला   माफीचे अंशदान देता येत असेल तर बिरवाडी हद्दीतील  गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या व सर्वांच्या घरपट्टी कराच्या रकमेला माफीचे अंशदान देणे द्यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे त्या मागणीची पूर्तता व्हावी .अन्यथा कराच्या रकमेत केलेल्या भ्रष्टाचार उघड होऊ नये या करिता माहिती देण्यास ग्रामविकास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आक्षेप सचिन बागडे यांनी लेखी निवेदनात नमूद करून बिरवाडी ग्रामपंचायतीकडे 14 वा वित्त आयोग निधी जमा खर्चाची माहिती  मागितली असता ग्रामसेवक यांनी माहिती दिली नाही माहिती अधिकार अर्जानुसार प्रथम अपील पंचायत समिती महाड व  द्वितीय अपील मा. राज्य माहिती आयोग बेलापूर कोकण भवन नवी मुंबई यांच्या कार्यालयाकडे  20 जुलै 2019 रोजी अपील करून अद्यापपर्यंत सचिन बागडे यांना मागणी अर्जानुसार माहिती मिळालेली नाही त्यामुळे वरिष्ठ कार्यालय देखील ग्रामविकास अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे सचिन बागडे यांनी  महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याला दिलेल्या जबाबामध्ये नमूद केले होते बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांच्या कार्यप्रणाली वरती तीव्र नाराजी व्यक्त करीत 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 :30 वाजल्या सुरू केलेले आमरण उपोषण ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर अखेर स्थगित करण्यात आले .
चौकट 
उपोषण करते सचिन बागडे हे उपोषण करत असलेल्या ठिकाणी महाड एमआयडीसी  पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सहाय्यक फौजदार प्रमोद शंकर काकतकर ,पोलिस कर्मचारी अमोल कुंभार ,या ठिकाणी कर्तव्य बजावत होते.बागडे यांच्या आमरण उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आय ,या राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्ते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी पाठिंबा दर्शविला नंतर ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन देत माहिती देण्याचे मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा उपोषण कर्त्यांच्या वतीने करण्यात आली .

Post a comment

0 Comments