वाढीव वीज बीलामुळे गोरेगाव येथील नागरिकांनी दिले महावितरणला निवेदन


रायगड, गोरेगाव
 (रिजवान मुकादम)
 कोकणात कोरोना रोगापाठोपाठ रायगड वासियांचे चक्रीवादळाने पार कंबरडे मोडले होते व त्यातच आता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळा मार्फत पाठवण्यात आलेली विज बिले हि अवाजवी व भरमसाठ आहेत.  पाठवण्यात आलेली विज बिले ही पूर्णतः चुकीची आणि अवाच्या सव्वा असल्याने गोरेगाव येथील तरुण आणि होतकरु वकील राजेश लिमजे यांनी त्यांच्या सहकार्यांसोबत आक्रमक पविञा घेत दि. ०३/०८/२०२० रोजी विद्युत महामंडळ गोरेगाव येथे तक्रार वजा निवेदन सादर केले.
    मार्च महिन्यापासुन सुरु असलेल्या लाॅकडाऊन मुळे मुळातच्  हवालदिल झालेली जनता व त्यातच जुन महिन्यात आलेले निसर्ग चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसान ची बऱ्याच नागरिकांना अद्याप ही शासनामार्फत मदद ही  मिळालेली नाही ,  रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता हवालदिल असताना विद्युत महामंडळामार्फत जुलै महिन्यात पाठवण्यात आलेल्या बिलांच्या रक्कमा बघून सर्वसामान्यांना एैन सनाच्या तोंडावर खिशाला काञी बसणार आहे. एवढी मोठी बिले कशी भरायची?? लाॅकडाऊनच्या काळात पैसा आणायचा कुठून?? विज खंडित करण्यात येईल का?? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात सतावत आहेत. स्थानिक राजकारणी यांनी ह्या समस्येकडे आवाज उठवणे आवश्वक असताना कोणीही महावितरणावर प्रश्न उपस्थित करत नसल्याने रायगडवासियांचे मनोधैर्य खचलेले असताना स्थानिक वकील श्री.  राजेश लिमजे यांनी या अडचणीच्या काळात पुढाकार घेत महावितरणास निवेदन देत जाब विचारला आहे.

Post a comment

0 Comments