फुलंब्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची बैठक संपन्न
 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

 आज फुलंब्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व सेलचे तालुकाध्यक्षांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष  नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील व तालुकाध्यक्ष राहुल डकले यांच्या उपस्थितीत झाली.यावेळी युवक तालुकाध्यक्ष विजय मोरे ,किसान सेल तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मते,सोशियल मिडीया अध्यक्ष गणेश सोनवणे,ओबीसी सेल अध्यक्ष कैलास गायके,अल्पसंख्याक अध्यक्ष हमीद शहा,युवक विधानसभा अध्यक्ष योगेश जोगदंडे,महिला अध्यक्ष सुनिताताई गायकवाड ,विद्यार्थी आघाडी चे अध्यक्ष श्रीराम बोडके,प्रवक्त  सेल चे अध्यक्ष ज्ञानेश्वर तायडे,सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गणेश जाधव , दिलीप कोंडके,बाळासाहेब शिंदे,प्रकाश पायगव्हाण,मनोज बखळे आदि उपस्थित होते.
        यावेळी तालुकाध्यक्ष  राहुल डकले यांच्या आदेशावरून सर्व सेलचे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे व  येते काही दिवसात सर्व  सेलचे  नवीन कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहेत .

Post a comment

0 Comments