शेलगाव खुर्द येथे कोरोना जनजागृती अभियान


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)


फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द या ठिकाणी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ औरंगाबाद व  डॉ.हेडगेवार हस्पिटल औरंगाबाद याच्या मार्फत कोरोना जन जागृती अभियान राबविण्यात आले.

स्वंस्थेच्या माध्यमातून बऱ्याच गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प गेल्या काही वर्षेपासून राबविण्यात येत आहे त्याच आनुषंगाणे आज गावामध्ये कोरोना जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय विषयी मार्गदर्शन करण्यात आले,स्वच्छते विषयी घेयवायची काळजी,आशा वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन केले.

सेवांकर वैद्यकीय विद्यार्थी चळवळ डॉ. हेडगेवार हस्पिटल, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ औरंगाबाद आणि विप्रो केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून आज दिनांक 1 ऑगस्ट या दिवशी सकाळी 9 वाजता शेलगाव या ठिकणी कोरोना जाणीव जागृती अभियान घेण्यात आले,यात वैद्यकीय शिक्षण घेणारे डॉ.किरण अल्हाट आणि अरुणोदय मानसिक आरोग्य प्रकल्प समन्वयक माधुरी गावीत यांनी या विषयाची शास्त्रीय माहिती दिली.सुनील गायके वाहन चालक यांनी सक्रिय सहभाग दिला.गावातील मंडळी यांनी सामाजिक अंतर ठेवून चांगल्या प्रकारे सहभाग नोंदविला.

Post a comment

0 Comments