धाकट्या भावाने मोठया भावाला पेट्रोल टाकून पेटवलेपुणे - बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी गावात एक भयानक घटना घडली. ‘तू वेगळे रहा’ असे मोठ्या भावाने सांगितल्याने झालेल्या वादातून लहान भावाने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले.पतीला वाचविण्यासाठी गेलेली पत्नीही जखमी झाली आहे.

मारुती वसंत भोंडवे (वय ४८) असे गंभीररीत्या भाजलेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. त्याच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी मारुती भोंडवे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा धाकटा भाऊ अनिल भोंडवे (वय ३२) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, मारुती भोंडवे याने धाकट्या भावाला ‘तू वेगळा रहा’, असे सांगितले होते. याचा राग आल्याने अनिलने मारुती भोंडवे यांच्या घराला कडी लावून खिडकीतून यांच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि काडी लावून पेटवून दिले.

दरम्यान, मारुती भोंडवे यांच्या अंगावरील आग विझवण्यासाठी त्यांची पत्नी पुढे आली असता त्या सुद्धा ह्या आगीत भाजल्या. सध्‍या दोघांवर उपचार सुरू आहेत.

Post a comment

0 Comments