दौंड कोवीड सेंटरमधील मधील रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे...


निलेश जांबले,दौंड-
पुणे
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील दौंड कोवीड सेंटरमधील मधील रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. परिचारिका संतोषी वरुटे, रेणुका रेड्डी, शीला लेहणे  यांनी कोवीड बाधितांना राखी बांधत ओवाळले. करोना विरुद्धच्या लढ्यात रक्ताच्या नात्यातील नसलेल्या या परिचारिका आपले कर्तव्य बजावत रुग्णसेवा देत आहेत.

 बहीण भावाला सुरक्षिततेसाठी  धागा बांधून ओवाळत असते आणि भाऊ पाठीशी जोपर्यंत आहे तोपर्यंत कसली चिंता भीती नाही तसेच आपुलकी माया प्रेम याचीही रक्षाबंधन हे एक प्रतीक आहे. सध्याच्या करोना विरुद्धच्या लढ्यामध्ये दौंड कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना भाऊ माणून जणू तुम्ही निश्चिंत रहा तुमच्या आरोग्याची आम्ही आम्ही घेतो असा संदेश परिचारिकांनी या रुग्णांना या सणाच्या माध्यमातून दिला

Post a comment

0 Comments