औरंगाबाद शहरात मॉल, हॉटेल बंदच राहणार; दुकाने सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणारऔरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून हळूहळू शिथिलता दिली जात आहे. त्यासाठी ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. औरंगाबाद शहरात काय सुरू राहणार, काय बंद राहणार यासंबंधीचा आदेश आज सायंकाळी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी काढला
शहरात दुचाकीवरून डबलसीट फिरण्यास, तसेच कारमध्ये चालकासह चौघांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. प्रशासकांनी आदेशात म्हटले आहे की, मिशन बिगिन अगेनअंतर्गत  किरकोळ खरेदी, व्यायाम यासाठी नागरिकांना जवळच्या भागातच जाणे बंधनकारक असेल. यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेची सर्व ठिकाणे मात्र मॉल, व्यापारी संकुले, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे व फूडकोर्ट, उपाहारगृहे वगळून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. ५ आॅगस्टपासून हा बदल होईल; परंतु मॉलमधील उपाहारगृहातील स्वयंपाकगृहांची घरपोच सेवा चालू राहील. 

दुचाकीवर मास्क, हेल्मेट सक्ती 
दुचाकीवरून डबलसीटला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दोघांनाही हेल्मेट आणि मास्क बंधनकारक आहे. तीनचाकी वाहनात चालक व दोन प्रवासी, चारचाकीमधून चालक व तिघांना प्रवास करण्याची परवानगी राहील. 

काय सुरू राहणार :
- लग्न समारंभासाठी खुली जागा, लॉन, वातानुकूलित नसलेले हॉल निर्बंधासह चालू राहतील. 
- वृत्तपत्राची छपाई व वितरण (घरपोच सेवेसह) चालू राहील. 
- मोकळ्या मैदानातील व्यायाम निर्बंधासह चालू राहील. 

काय बंद राहणार :
- जलतरण तलावांना परवानगी नाही. 
- शहरात मॉल, हॉटेल बंद राहणार 
- व्यापारी संकुले, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे व फूडकोर्ट, उपा हार गृह वैगरे बंद राहील

Post a comment

0 Comments