एकाच वेळी शैक्षणिक शुल्क आकारण्यात येवू नये यासाठी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे निवेदन


 पैठण प्रतिनिधी.विजय खडसन : ----
कॉलेज प्रशासनाकडून संपूर्ण शैक्षणिक शुल्क एकाच वेळी भरण्यासंदर्भात होणारी अन्यायकारक सक्ती थांबण्याबाबत छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेने आज प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत व मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले असून निवेदनात नमूद असे की,
सध्याची परिस्थिती बघता फक्त राज्यावरच नव्हे,तर देशावर आर्थिक संकट आलेले आहे.स्थानिक पातळीवर छोट्या प्रमाणात असलेले उद्योग, शेतकरी,हातमजुरीवर घर चालवणारी मंडळी तसेच इतर सर्व क्षेत्रात काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसलेला आहे.
या परिस्थितीमध्ये आपल्या कॉलेज कडून विध्यार्थीनां एकाच वेळी संपूर्ण शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. शैक्षणिक शुल्क याबाबत पालक- शिक्षक संघाची मीटिंग घेवूनच मग पुढील निर्णय सर्व मान्यतेने घेण्यात येतो परंतु प्रतिष्ठान महाविद्यालय येथे अशी कोणत्याही प्रकारची पालक- शिक्षक संघाची बैठक घेण्यात आली नसून एक प्रकारे हा पालक व विद्यार्थी यांना अंधारात ठेवून सक्ती करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शुल्क भरू न शकल्यास पुढ्याच्या वर्गामध्ये प्रवेश मिळेल का नाही असा संभ्रम विध्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. ज्यामुळे विध्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मुदत वाढ करण्यात यावी किंवा काही टप्यामध्ये शुल्क भरण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि छावा क्रांतिवीर विध्यार्थी संघटनेद्वारे करण्यात येत असून
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा अन्यथा छावा क्रांतिवीर सेना मार्फत आपल्या कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे निर्दशने करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
यावेळी उपस्थित
विद्यार्थी आ.तालुका अध्यक्ष गोविंद बावणे, वि.आ.उपतालुका अध्यक्ष अविनाश पा. राऊत, प्रदीप मगरे, अविनाश पाटील, आविष्कार झारगड, गणेश गरड, राकेश  वाघे, अक्षय सातपुते आदी उपस्थित होते.....!

Post a comment

0 Comments