हिरवा शालू नेसलेली अजिंठा लेणी पर्यटकांसाठी बंद .पर्यटन प्रेमींचा हिरमोड .

औरंगाबाद

कोरोणा मुळे अजिंठा लेणी चे मनमोहक दृश्य पाण्यापासून पर्यटन प्रेमी वंचित आहे. पावसाळ्याच्या दिवसात अजिंठा लेणीहिरवा शालू नेसलेली पाहिल्यावर पर्यटकांना स्वर्ग पाहिल्या सारखा भास होतो पण जगावर आलेल्या कोरोना महामारी चा संकटामुळे अजिंठा लेणी पुथ्वी वरील स्वर्ग पाहण्यासाठी पर्यटकांना आज बंदी आहे .

 पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदी नाल्यांमध्ये वाहणारे  पाणी खळखळणारा आवाज व लेणीचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक या दिवसात हजारोच्या संख्येने उपस्थित राहतात पण कोरोणा मुळे आज हे दृश्य पाहण्यास पासून पर्यटक वंचित आहेत जेणेकरून कोरोना चा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने ही खबरदारी घेण्यात आली आहे .पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आले आहे .येथे येणाऱ्या पर्यटकांना कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने देखील खबरदारी घेण्यात आली आहे .याठिकाणी काही दिवसापूर्वी व्हिव्यु पॉईंट येथे पिंपळदरी ग्रामस्थांच्यावतीने टाळे लावण्यात आले आहेत जेणेकरून या ठिकाणी कोणीही येणार नाही . यामुळे आज अजिंठा लेणी पर्यटकासांठी बदं आहे.

प्रतिनिधी सुनील वैद्य औरंगाबाद

Post a comment

0 Comments