औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस संघटन मजबूत करणार -डॉ. कल्याण काळे


*औरंगाबाद, दि. ४

जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी भक्कमपणे मजबूत करण्यासाठी शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील प्रत्येक तळा-गळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस संघटन मजबूत करणार असा निर्धार नवनिर्वाचित जिल्हाअध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पदगृहण सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे व नवनिर्वाचित शहराध्यक्ष हिषाम उस्मानी यांचा आज पदग्रहण समारंभ शहागंज येथील गांधी भवनात आयोजित करण्यात आला होता या वेळी काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण डोंणगावकर यांनी केले. 

यावेळी माजी आमदार सुभाष झाम्बड, शहराध्यक्ष ऍड सय्यद अक्रम, इब्राहिम पठाण, जितेंद्र देहाडे,महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखा पानकडे, महिला शहराध्यक्ष सरोज मसलगे यांनी आपले मनोगत व्यक्त करत नवनिर्वाचित अध्यक्ष तथा शहराध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, काँग्रेसचे शहराध्यक्ष हिषाम उस्मानी, महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र काळे, यांची उपस्थिती होती. 

यावेळी पुढे बोलताना डॉ. काळे म्हणाले की, सद्यस्थितीत जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा एकही आमदार खासदार नाही. यामुळे पक्ष संघटन मजबूत करणे ही फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. सर्व फ्रंटलं चे अध्यक्ष यांना बरोबर घेऊन कार्य व पक्ष बांधणी करणे, महिलांचे संघटन वाढवणे यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. येणाऱ्या ग्राम पंचायत, महापालिका, व विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी बोलतांना नमूद केले. जिल्हा शहराध्यक्ष यांना सोबत घेऊन समन्वयाने काम करणार असल्याचे डॉ. कल्याण काळे यांनी स्पष्ट केले. यामध्ये जेष्ठांच्या अनुभवाचा फायदा व नवयुवकांचा सहभाग वाढवून काँग्रेस पक्षाचा विचार गावपातळीपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. 

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज ठोंबरे, अल्पसंख्याक सेल चे जिल्हाध्यक्ष मजहर पटेल, इंटक चे अध्यक्ष सचिन शिरसाठ, अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पवन डोंगरे, एन एस यु आय चे अध्यक्ष मोहित जाधव, औरंगाबाद काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रामू शेळके, फुलंब्री तालुका अध्यक्ष संदीप बोरसे, सर्जेराव चव्हाण,कन्नड तालुका अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, खुलताबाद तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे, सिल्लोड तालुका अध्यक्ष भास्कर घायवट, सोयगाव तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, कन्नड शहराध्यक्ष राजेंद्र चव्हाण, पैठण शहराध्यक्ष हस्नोद्दीन कटारे, फुलंब्री विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वियथल कोरडे, मध्य चे अध्यक्ष गौरव जैस्वाल, पूर्वचे मोहसीन खान, जिल्हा परिषद सदस्य कल्याण  चव्हाण, सुरेश शिंदे, बबन कुंडारे, कलिम पटेल, प्रदेश युवक काँग्रेसचे अकिल पटेल, योगेश मसलगे,गौतम माळकरी, शीला मगरे, आदींची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सावंत यांनी केले तर आभार माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी मानले.

Post a comment

0 Comments