चोरट्यांचा पोलिसांवर चाकू हल्ला, दोघांना अटक
पुणे -  घरफोडी केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी त्यांच्यापाठोपाठ पळालेल्या दोघा पोलिसांवर चोरट्यांनी चाकूने हल्ला केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि १२) रात्री वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौकात घडला.

सागरसिंग कालुसिंग जुनीं आणि जलसिंग जर्मनसिंग जुनीं अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईराम विलास सोसायटीत दोन चोरटे शिरले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार बीट मार्शलचे जवान घटनास्थळी पोहोचले असता पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत मुद्देमालासह त्यांना पकडले परंतु, यातील एकाने पोलिसांच्या अंगावर चाकूने हल्ला केला.

अंगावर असलेल्या रेनकोटमुळे सुदैवाने पोलिसांना दुखापत झाली नाही. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.

पोलीस घटनास्थळी आल्याचे समजताच आरोपीने दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस कर्मचारी शिरसाठ आणि फिरून शेठ यांनी त्या दोघांनाही पकडले. यावेळी त्यांनी ‘पोलीस वाले को खत्म कर दो’ असे म्हणत त्यांच्यावर चाकूने हल्ला केला

Post a comment

0 Comments