हर्सूल तलावात तरुणाचा बुडून मृत्यूऔरंगाबाद: हर्सूल तलावात पडल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजता घडली. याविषयी हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रद्युम ईश्वर वरकड (वय १८, रा.सारावैभव सोसायटी, जटवाडा रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.


या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, मृत प्रद्युम हा २ ऑगस्ट रोजी सायंकाळी हर्सूल तलाव परिसरात फिरायला गेला होता. रात्री ८ वाजेच्या सुमारास तो तलावात पडला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन अधिकारी  आर. के. सुरे, हरिभाऊ घुगे, शिवसभा कल्याणकर, संजय शिंदे यांनी दोन तास शोध मोहीम राबवून प्रद्युमला बेशुद्धावस्थेत तलावाबाहेर काढले. 

यानंतर त्याला सुदाम दाभाडे यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी त्याला तपासून तो मरण पावल्याचे सांगितले. या विषयी  हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक  नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भादवे तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments