रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन संपन्न.


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:---
 पैठण तालुक्यातील विहामांडवा येथिल रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखाना विहामांडवा येथे 20/21 गळीत हंगामाचे रोलर पूजन आज कारखान्याचे चेअरमन तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते दिनांक (4) रोजी सकाळी अकरा वाजता पार पडले यंदा पाऊस चांगला असल्याने उसाचे  पीक चांगले प्रमाणात आलेले आहे त्यामुळे साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्यासाठी लगबग केली आहे यावर्षी एक महिना आधीच कारखाना चा हंगाम सुरू करण्याची तयारी कारखान्यांनी दर्शवली आहे कोरणा परिस्थिती मुळे संचालक मंडळ व कामगारांचे उपस्थितीत  रोलर पूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी चेअरमन भुमरे यांनी 3 लाख 21 हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले व त्याच प्रमाणे कार्यक्षेत्रात संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले पुढील वर्षी कारखान्याची उत्पादन क्षमता अडीच हजार मेट्रिक टन करण्याचे ही या वेळी सांगितले मागील महिन्यात नामदार भुमरे यांच्या वाढदिवस असल्यामुळे कारखाना परिसरात प्रदीप नरके यांच्या वतीने 58 नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात  आले
यावेळी चेअरमन संदिपान भुमरे, रेणुकादेवी शुगर मिल चे दत्तात्रेय रेवडकर, रोहिदास रेवडकर,  नंदलाल काळे, दादा पा.बारे,रघुनाथ पा.ठोंबरे विष्णू नवथर,संपत गांधले, रावसाहेब घावट, महावीर काला, लहु डुकरे ज्ञानोबा  बोडखे, सुभाष गोजरे, नंदू पठाडे, कल्याण धायकर, सोमनाथ परदेशी, दत्तात्रय वाकडे, शेरू भाई शेख, संदिपान काकडे, भूषण तवार, हे संचालक यांच्यासह.कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, जनरल मॅनेजर राजेंद्र काळे, दादा बारे, किशोर चौधरी, नामदेव खराद यांच्यासह चीफ इंजिनियर सुनील इंगोले, भगवान कांबळे, सिद्धार्थ सोनवणे, शेख सय्यद, महेश मस्के, तुळशीराम अहिरे, चंद्रकांत पाटील, अफसर शेख, संतोष तांबे, श्रीमंत टेकाळे, आमोल नरके व कामगार कर्मचारी व शेतकरी यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments