फुलंब्री तालुका भाजप कार्यकारणी जाहीर


 
 
फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

तालुका भारतीय जनता पार्टीची नविन पदाधिकारी व सदस्य कार्यकारणीची निवड केंद्रीय मंत्री खासदार रावसाहेब दानवे व आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केली आहे. तालुका कार्यकारणीत मंडळ कार्यसमिती, विशेष निमंत्रित सदस्य , कायम निमंत्रित सदस्य  अशा प्रकारच्या चार मंडळ समित्यात्या मध्ये गांवागांवातील कार्यकर्त्यांचा समावेश करुन तालुका भाजपा तालुका कार्यकारिणी गुरुवारी  जाहिर करण्यात आली आहे. तालुका उपाध्यक्षपदी सर्जेराव मेटे, मंगेश साेटम, रामेश्वर चाेपडे, पंडित नागरे, आप्पाराव काकडे, लिलाबाई काळे तर महामंत्री, मंत्री अशा पदांवर गाेपाळ वाघ, सुचित बाेरसे, राेषण अवसरमल, आबासाहेब फुके, अण्णा सातपुते, समाधान नवले, मनाेहर साेनवणे, विलास दानवे, महामंत्री सुचित बोरसे, मुक्ताबाई पाथ्रे, काेषाध्यक्ष चंद्रशेखर पालकर, हरिकिसन सांगळे, प्रफुल्ल शिंदे, मयुर कोलते, पवन तिवारी,सुदाम पवार, यांच्यासह 61 जनांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या सोबतच सर्व आघाड्यांचे तालुकाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. यात महिला- आघाडी एैश्वर्या गाडेकर, युवा माेर्चा- बाळासाहेब तांदळे, अल्पसंख्यांक- फारूक नसीर शेख, अनुसुचित जाती –साेमिनाथ भालेराव, इतर मागासवर्ग –राम बनसाेड, किसान माेर्चा- राजु तुपे, फुलंब्री शहराध्यक्ष याेगेश मिसाळ, युवा माेर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तर निमंत्रित सदस्य म्हणून डाॅ. नामदेवराव गाडेकर, जि.प. सदस्य अनुराधाताई चव्हाण, शिवाजीराव पाथ्रीकर, जितेंद्र जैस्वाल,  सभापती सविता फुके, संजय त्रिभुवन, उपनगराध्यक्ष गजानन नागरे,  पं.स. सदस्य एकनाथ धटिंग, सोनाली सोनवणे, कौशल्य जंगले, विनोद मानकापे, तारुअप्पा मेटे, मंगलबाई वाहेगांवकर , दत्ता ताठे, प्रभाकर सोटम , नरेंद्र देशमुख, सोमनाथ कोलते, विकास कुलकर्णी, कल्याण चव्हाण, प्रदिप गाडेकर यांच्यासह 41 जनांची निवड करण्यात आली आहे. कायम निमंत्रीत सदस्य पदी कृष्णा गावंडे, याेगेश भुमे, भाऊसाहेब धाेंडकर, कारभारी वहाटुळे, रंगनाथ केजभट,  मनोज चिकटे,अरूण वहाटुळे यांच्यासह 23 जनांची निवड तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments