एक गाव एक गणपती संकल्पना राबवा-सपोनि सत्यजित ताईतवाले यांचे आवाहनवैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन)

जागतिक प्रादुर्भाव असलेल्या कॊरोनाशी सर्व जग दोन हात करत असताना शिऊर गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविल्यास एक नवीन आदर्श उभा राहून गावाचा लौकिक वाढेल असे मत शिऊर पोलीस ठाण्याचे स पो नि सत्यजित ताईतवाले यांनी केले. 
आगामी गणेशोत्सव निमित्ताने शिऊर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करतांना ताईतवाले बोलत होते. 
गणेशोत्सव काळात काही मार्गदर्शक सूचना सरकारने दिलेल्या असून त्या अमलात आणा, विसर्जन मिरवणूक, मोठी मूर्तीची प्रतिष्ठापणा, डीजे डॉल्बीचा वापर करू नये अश्या सूचना ताईतवाले यांनी केले. 
यावेळी सरपंच नितीन चुडीवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सरपंच बबनराव जाधव, माजी उपसरपंच नंदकिशोर जाधव , तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष भास्करराव जाधव, उपाध्यक्ष चांगदेव जाधव, आयुबअली सैययद, गंगादादा जाधव, विजय बनकर, बाळा पाटील जाधव, महेंद्र देशमुख,  वसंत पवार, संदीप आढाव, अनिल भोसले, शिरीष चव्हाण, अनिल भोसले, सुशील देशमुख, आदिनाथ गुजर, मंगेश जाधव, यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नागटिळक, रवींद्र काळे, अमोल कांबळे, किरण रावते, अविनाश भास्कर, गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 
गावातील सर्व गणेश मंडळातील पदाधिकारी सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात येऊन एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वास सरपंच नितीन चूडीवाल यांनी व्यक्त केला.

गणेश मंडळ सकारात्मक 
वैजापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या शिऊर गावातील आठही गणेश मंडळ एक गाव एक गणपती ही संकल्पना  राबविण्यास सकारात्मक आहे, लवकरच आधिकृत जाहीर करण्यात येईल

Post a comment

0 Comments