श्रीराम मंदिरात शिवसेना- युवसेनाच्या वतीने महाआरती संपन्न फुलंब्री(प्रतिनिधी गजानन इधाटे) 
आयोध्यातील राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर आज फुलंब्री येथे श्रीराम मंदिर येथे  तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .
          फुलंब्री येथे आज सकाळी श्रीराम मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे ,  कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रकांत जाधव,  उपतालुका प्रमुख  सोमिनाथ करपे, बापुराव म्हस्के, राधाकिसन कोलते,  रमेश दुतोडे, संजय मोटे, उमेश दुतोडे,   युवासेना तालुका प्रमुख राजु तायडे,  युवासेना उपतालुका प्रमुख भारत भुमे ,  हरिदास घडमोडे, कृष्णा  पवार,  मधुकर सोनवणे,  सुरज सोनवणे, किशोर ठोंबरे,  गोविंद लहाने, बाळु तावडे , बंटी गंगावणे, व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments