दुध दरवाढीसाठी भारतीय जनता पक्षाचा वैजापूर मध्ये महाएल्गार


वैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

वैजापुर शहरामध्ये व ग्रामिण भागात ठिकठिकाणी महा आघाडी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी आज दिनांक 1 ऑगस्ट ला दुध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले.हे आंदोलन वैजापुर मध्ये 
शेतकऱ्यांना दुधाचे भाव वाढून मिळावे यासाठी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मा.नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी,वैजापुर भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष कल्याण दांगोडे, कचरू डिके पाटील,औरंगाबाद चे मोहनराव आहेर, सुरेश राऊत, नाना गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली इतर कार्यकर्त्यांसंवेत पार पडले. 
तसेच महालगाव मध्ये डॉ बाबासाहेब डांगे ,सतीश शिंदे ,दादासाहेब मोइन, विजय चव्हाण, नितीन जोशी, शिऊर बंगला येथे कैलास पवार , सुनील पैठणपगारे , नारायण तुपे,  शिवनाथ तुपे,लाडगाव मध्ये नबी पटेल ,कारभारी कराळे, प्रवीण सोमवंशी, कानिफनाथ आहेर, अजय शिंदे,दहेगाव मध्ये शेड फाटा जवळ प्रताप महेर ,राजेंद्र चव्हाण ,अनिल वाणी विपिन साळे ,राजेंद्र देशमुख, लोणी मध्ये ज्ञानेश्वर पाटील जगताप, उदय सोनवणे, दिलीप सोनवणे, नारायण काटे आदींच्या नेतृत्वाखाली पार पडले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे वैजापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, नेते ,पदाधिकारी ,यांनी हजर राहून आंदोलन  यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.आंदोलन कर्त्यांनी नियम पाळून समाजिक अंतर ठेवून, मास्क लावून आंदोलन केले.

Post a comment

0 Comments