खंडाळा येथे गणेशोत्सव रद्द या वर्षी गणपती न बसविण्याचा मंडळांने घेतला निर्णय


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


 गणेशोत्सव म्हणजे मोठ्या मूर्ती, देखावे, महाआरती, आगमन आणि विसर्जनाच्या थाटातील मिरवणुका, देखाव्यांची स्पर्धा करणारी गणेशभक्तांची गर्दी. हे सगळे यावर्षी कोरोनामुळे दिसणार नाही.वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द करुन अन्य उपक्रमांचे करण्याचे ठरवले आहेत.यात जय श्रीराम गणेश मंडळ,जब्रेश्वर गणेश मंडळ, रामराज्य गणेश मंडळ,या महत्त्वाच्या असनारे मोठ्या गणेश मंडळ यांचा समावेश आहेत, याशिवाय, अन्य सर्व गणेश मंडळ दरवर्षीप्रमाणे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार नसुन.या उत्सवात होणारा  खर्च सामाजिक भान राखत आरोग्यविषयक उपक्रमात किंवा गरजु विद्यार्थ्यांना खर्च करण्यात येणार असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते यांनी सांगितले.
कोरोना महामारी सारख्या भयंकर आजार ला रोखण्यासाठी गणेश मंडळांनी यंदा रस्त्यावरील मंडप तसेच मिरवणूक आदी गोष्टींना पूर्णपणे  नकार दिला आहे. घरोघरी शाडूची मूर्ती ही चळवळही अनेक गणेश भक्तांनी राबविण्याचे ठरविले आहेत.
वैजापूर पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाल रांजणकर, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवार दि.18 रोजी खंडाळा येथे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यां सोबत शांतता कमीटीची बैठक घेण्यात आली. अनंत कुलकर्णी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता या उत्सवावर होणारा खर्च सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तम असा प्रतिसाद देत मंडळांनी वरील निर्णय जाहीर केला आहे. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,माजी सरपंच गोरखनाथ शिंदे, गोपनीय शाखेचे संजय घुगे,बिटजमादार मोईस बेग, पोलीस पाटील नितीन बागुल,ग्रा.पं.सदस्य विजय मगर, भिमराव बागुल,जयंता वेळंजकर, राजेंद्र जानराव,जय श्रीराम गणेश मंडळ,जब्रेश्वर गणेश मंडळ, रामराज्य गणेश मंडळ यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments