शेवता खुर्द येथील दोन कुटुंब उघड्यावर मदतीची मागणीफुलंब्री (प्रतीनीधी गजानन इधाटे) 

तालुक्यात गेल्या दहा बारा दिवसापासून सतत पाऊस पडत असून या पावसाने
शेवता खुर्द  येथील सोमीनाथ कृष्णा बेडके व सुभाष दादा बेडके यांचे राहते घर पडले असूून या दोन कु़टुंबावर भर पावसाळ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.घर कोसळल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला असून पंचनामा करुन मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


शेवता येथील  सोमीनाथ बेडके व सुभाष बेडके यांची पारिस्तिती अतिशय हालाखीहच असून मोल मजुरी करून आपला उदर निर्वाह करतात, राहाते घर पडल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले.यामुळे   पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत मिळून दयावी अशी मागणी त्यांची असून, या कुटुंबाला गावातून सहारा देण्यात आला असून प्रशासनाकडून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे उप सरपंच राजू तुपे यांनी सांगितले

Post a comment

0 Comments