एम आय डी सी महाड येथील महाड उत्पादक संघ कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन लोकार्पण


रायगड  - महाड येथील एम आय डी सी मध्ये 200 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई उदघाटन केले. के एस एफ कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या 200 बेडची क्षमता असलेल्या कोविड केअर सेंटरच्या  ई-उद्घाटन व लोकार्पण आज करण्यात आले डेवा ड्रील कंपनीचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या सहकार्याने हे केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भास्कर जगतापहे प्रत्यक्ष उपस्थित होते.
प्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments