भारतीय स्टेट बँकेचा मनमानी कारभार .शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेणा ...कोरोना महामारी च्या काळात सोशल डिस्टन्सिगंचा उडीवीला जातो फज्जा ...

अजिंठा - 

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अजिंठा येथील शाखेचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे.या भागातील शेतकऱ्यांच्या  समस्याकडे बँक प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहेत तर सोशल डिस्टन्सिगंचा पुरता बोऱ्या वाजला आहेत सुरक्षारक्षक मात्र काय करतात मोठा प्रश्न निर्माण झाला आहेत .

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील बस स्थानक परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँक शाखा अजिंठा या शाखेचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे . याठिकाणी मागील दोन महिन्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी फाईल दाखल केले असतानादेखील त्यांना अद्यापही पीक कर्ज विषयी माहिती दिली जात नाही पण अशाही काही गोष्टी समोर येत आहे काही शेतकऱ्यांच्या फाईली आठ ते पंधरा दिवसांमध्ये या शाखेतून पीक कर्ज मंजुरी दिली आहेत या शाखेतून शेतकऱ्यांना समाधानकारक कुठलीही माहिती दिली जात नाही सुरक्षा रक्षक येथे येणाऱ्या ग्राहकाना शिवीगाळ करतो पण सर्वात मोठा विषय अजिंठा या गावांमध्ये जिल्ह्यात यात झपाट्याने कोरोना चे रुग्ण सापडत होते पण वेळीच प्रशासनाने खबरदारी घेतल्याने रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे पण आज बँकेसमोर चित्र पाहिल्यास हे चित्र कोरोणा सारख्या महामारीला पुन्हा आमंत्रण देऊ शकते का यावेळी बँक प्रशासन ,
सुरक्षा रक्षक काय करते पुन्हा वाट बघितली जात आहे का अजिंठा गावामध्ये कोरोणाचे रुग्ण वाढण्याची हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे . एकीकडे प्रशासन कोरोणा पासून बचावासाठी विविध उपाय योजना करीत आहेत तर याठिकाणी काही वेगळे चित्र पाहायला मिळत आहे .

(प्रतिनिधी : सुनील वैद्य औरंगाबाद )

Post a comment

0 Comments