विना अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या संसाराची राख रांगोळी झाली - संभाजी ब्रिगेड


निलेश जांबले दौड

-पुणे

विनाअनुदनित शिक्षक सध्या १५-२० वर्ष झाले फुकट नोकरी (ज्ञानदान) करत आहेत. हेच शिक्षक स्वतःचा संसार रस्त्यावर आल्याने आत्महत्या करत आहेत. वीस वर्षापूर्वी ज्या मुलांना शिकवत होते त्यात मुलांच्या शेतात आज मोल मजुरी करत आहेत. कॉलेज वरील ११ वी १२ वी चे प्राध्यापक वैफल्यग्रस्त आवस्थेत आहेत. 20 वर्ष झाले त्यांना अनुदान नाही त्यामुळे राजगार हमीच्या कामावर आहेत. फुकट नोकरी करताना बिचाऱ्यांना नोकरी ही सोडता येत नाही. अनेकाच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे. खूप आत्महत्या झाल्या. शाळा कॉलेज सुटल्यावर हे शिक्षक भाजी विकतात, आज कोणी कटिंग सलून चालवतात, तर कोणी शेतात मजुरी, कोणी गवंड्याच्या हाताखाली ई. अनेक कामे करून प्रपंच चालवतात. 'राज्य सरकारने विनाअनुदानित शिक्षकांना किमान २० टक्के तरी वेतन दिले पाहिजे.'

सरकार आंधळे, बहिरे आणि मुके आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र पाठवून सुद्धा त्या दखल घेत नाहीत. आजपर्यंत एकाही पत्राचा रिप्लाय (Reply) दिलेला नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयातून पत्राचा रिप्लाय येतो मात्र शिक्षण मंत्री कोणताही रिप्लाय देत नाहीत. कदाचित काँग्रेसच्या मंत्र्यांना आलेल्या पत्राला रिप्लाय (Reply) देण्याचा सुद्धा अधिकार नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मेडिया दखल घेत नाही. शिक्षक संघटना व आमदार काहीच करत नाहीत फक्त आश्वासने देतात. राज्यात शिक्षक प्राध्यापकांची संख्या 30 हजार च्या जवळ जवळ आहे. त्यांना कोनीच वाली नाही. मन पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या आहेत. कारण व्यवस्था निष्क्रिय आहे. शिक्षणमंत्र्यांना निर्णय घेता येत नसेल, त्यांना पत्राला रिप्लाय देता येत नसेल आणि विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न सुटत सोडवता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे


Post a comment

0 Comments