तहसिल कार्यालय पैठण येथे अटल आनंदवन घनवन ( Dense Forest ) योजने अंतर्गत वृक्षारोपण


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:-— पैठण तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या उत्तर बाजुच्या रिकाम्या जागेत क्षेत्र २ आर रोप संख्या ५०७ एकूण प्रजाती ३५ वड , हिरडा , बेहडा , जांभूळ , आंबा , अर्जुन , शिसव रेन्ट्री बांबू , मोगरा , गुलाब , आवळा इत्यादी ३५ प्रजातीचे रोपे १ वर्ग मीटर मध्ये 3 झाडे याप्रमाणे सघन पद्धतीने लागवड केली.या आनंदवन घनवन चे उदघाटन तहसीलदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या वेळी तहसिलदार चंद्रकात शेळके यांनी अशा घनवन पद्दतचे खुप मोठे फायदे आहेत . यामध्ये छोट्या जागेत मोठया प्रमाणात झाडांची लागवड होते . परस्पर स्पर्धेमुळे झाडे जोमाने वाढतात , विविध झाडाची मुळे आपआपसात गुंतून सशक्त मुळसंख्या तयार होते . छोट्या जागेतून प्रचंड प्रमाणात ऑक्सीजन तयार होतो . प्राणी , पक्षी , फुलपाखरे असंख्य जीवजंतू यांना हक्काचा अधिवास प्राप्त होतो . झाडे स्वतःची सेंद्रिय खादये स्वतः तयार करतात . वायू व ध्वनी प्रदूषणापासून संरक्षण होते . जमिनीची धूप थांबते . पाण्याच्या पातळीत वाढ होते . तापमान कमी होण्यास मदत होते . परागीभवनास मदत होते . जैवविविधता राखली जाते . या मुळे छोटी जंगले तयार होतात . झाडे जगण्याची शक्यता ९ ० टक्के असते . झाडे संगोपनाचा कालावधी कमी असतो.असे या आनंदवन घनवनचे महत्व सांगीतले . यावेळी श्री.व्ही.यु कवडे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण , पैठण श्री . सिदार्थ गायकवाड श्री.जनार्धन दराडे सर , श्री दयानंद लकशेटे , वैभव सोनवणे , श्री . कृष्णा राजगे वनपाल , श्री.गणेश बिरसोने , वनरक्षक श्री.वैभव गिरी श्री.दिलीप आरले , दत्ता कबाडे , नारायण वाघ अनिल घोडके आदी उपस्थित होते

Post a comment

0 Comments