वाळूची अवैध चौरटी वाहतुक करताना नदी पात्रात वाहन पकडले भरारी पथकाची कारवाई वाहन मालकास 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन
:— तालुक्यातील हिरडपुरी येथील गोदावरी नदी पात्रात  वाहनाद्वारे वाळू चोरी सुरू असल्याची माहिती मिळाल्याने 
 तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील मंडळ तलाठी डी जी सवणे , कोतवाल अनिल घोडके , वाहन चालक  सोमनाथ सुशे, यांनी रविवारी रात्री साडे नऊ वाजता वाळू चोरी करताना वाहन पकडले . 
           हिरडपुरी येथील गोदावरी पात्रात वाळू चोरी सुरू असताना दुर्लक्ष केले जात आहे . अवैध वाळू चोरी बाबत कारवाई करताना पोलीस प्रशासनाला महसूल चे अधिकारी सोबत घेत नसल्याने दोघात समन्वय नसल्याचे दिसत आहे . आपले चांगभले करण्यासाठी आपापल्या परीने कारवाई करण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन जात आहे . पाचोड पोलिसांनी हिरडपुरी येथील गोदावरी नदी पात्रात एकही कारवाई केली नाही . त्यामुळे अवैध वाळू चोरीला प्रशासन कानाडोळा करत असल्याने संशय केला जात आहे . भरारी पथकाने पकडलेल्या वाहनास तहसील  कार्यालयात जमा केले आहेवाळू वाहतूक करताना पकडलेल्या वाहन मालकास  1 लाख  60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे . 
चंद्रकांत शेळके तहसीलदार पैठण

Post a comment

0 Comments