आयफोन 12 मिनी’ ठरेल Appleचा सगळ्यात लहान स्मार्टफोन

मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन Apple कंपनी या पुढच्या महिन्यात आपल्या चार नव्या फोनसहित ‘आयफोन 12’ ही नवी सिरीज (Iphone12 series) लाँच करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चार नवीन मॉडेल्सपैकी 5.4 इंच डिस्प्ले असणारा ‘आयफोन 12 मिनी’ (Iphone12 Mini) हा Appleचा सगळ्यात लहान स्मार्टफोन असणार आहे. आयफोन 12च्या सिरीजमधील स्मार्ट फोनचे फोटो प्रसिद्ध झाले असून, यातील सगळ्यात लहान आकाराच्या फोनला ‘मिनी’ (Mini) म्हटले गेले आहे.

आयफोन 12च्या सिरीजमध्ये 6.7 इंचाच्या स्मार्टफोनला ‘आयफोन 12 प्रो मॅक्स’ असे नाव देण्यात आले आहे. तर, 6.1 इंच डिस्प्ले असणारे दोन स्मार्ट फोन ‘आयफोन 12’ आणि ‘आयफोन 12 प्रो’ या नावाने ओळखले जाणार आहेत. या चारही स्मार्टफोन्समध्ये 5जी कनेक्टीव्हीटी दिली गेली आहे. या व्यतिरिक्त ‘आयफोन 12’ सिरीजच्या चारही फोन्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments