घोडेगाव येथे नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यूगंगापूर (प्रतीनीधी प्रकाश सातपुते )
गगापुर तालुक्यात 
घोडेगाव येथे नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या  22 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी दोन वाजता घडली राहुल मधुकर शिंदे असे या युवकाचे नाव आहे
  पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार घोडेगाव येथील राहुल मधुकर शिंदे हा १४ सप्टेंबर गावाजवळ असलेल्या नारळी नदीच्या पात्रात दुपारी पोहण्यासाठी गेला होता पोहतांनी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती शिल्लेगांव पोलीसांना मिळाली असता घटनास्थळी पी. एस. आय राम बाराहाते हे काँ अमोल करवंदे, विठ्ठल जाधव,मुसळे आदींनी धाव घेत अग्नीशामक दलास पाचारण करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेहास पाण्याबाहेर काढून  लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करत स्ववविच्छेदन करण्यात आले राहूल हा बि.एस.सीच्या दुसऱ्या शिक्षण घेत होता आई वडीलांना एकुलता एक मुलगा होता राहुल मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने याच्या निधनामुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्याच्या पश्चात आई ,आजी, मामा, मामी असा परिवार आहे या प्रकरणी शिल्लेगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय राम बाराहाते, हे. काँ.अमोल करवंदे, विठ्ठल जाधव आदी करत आहेत

Post a comment

0 Comments