वैजापूर शहरातील प्रथमच नारंगीमध्यम प्रकल्पात 98 टक्के जलसाठागुरुवारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग


वैजापूर( प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पात ९८% इतका पाणीसाठा झाल्याने गुरुवारी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात येऊन पाण्याचा नदी पात्रात विसर्ग करण्यात आला. माजी आमदार आर एम वाणी यांच्या हस्ते विधीवत पूजन करून नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या हस्ते प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले.

यावेळी तहसीलदार निखील धुळधर, मुख्याधिकारी भागवत बिघोत, माजी नगराध्यक्ष रविंद्र संचेती, मर्चंट बँकेचे चेअरमन विशाल संचेती, नांमप्रचे कार्यकारी अभियंता विजय लाड, प्रशांत वनगुजरे,सी आर मतसागर, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, पारस घाटे, दिनेश राजपूत,राम पिलदे आदी उपस्थितीत होते.

यावर्षी जून महिन्यात शून्य टक्के वर असलेल्या नारंगी मध्यम  प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या पावसामुळे गुरुवारी धरणात ९८ टक्के पाणी साठा झाला.  गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास प्रकल्पाचा दरवाजा क्रमांक ०१ व ०५   ७० क्यूसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. प्रकल्प तयार झाल्यानंतर वर्ष २००६ व २००९ नंतर पाण्याचा विसर्ग करण्याची ही तिसरी वेळ आहे.  पाणलोट क्षेत्रातुन जोपर्यंत पाण्याची आवाक सुरु असेल तोपर्यंत विसर्ग सुरु राहणार असल्याची FC माहिती

कार्यकारी अभियंता विजय  लाड यांंनी दिली.

नारंगी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले
मा.आ.आर एम वाणी मा.नगराध्यक्ष रविंद्र (बाळासाहेब) संचेती विशाल संचेती नामप्रचे कार्यकारी अभियंता विजय लाड प्रशांत वनगुजरे सी आर मतसागर नगरसेवक स्वप्निल जेजूरकर बंडू वाणी पारस घाटे दिनेश राजपूत इम्रारान कुरेशी व परिसरातील सर्व शेतकरी व नागरीक उपस्थित होते

Post a comment

0 Comments