दौंडमध्ये चक्क ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबीय करतायेत शासकीय जागेवर अतिक्रमण....BDO, सरपंच, ग्रामसेवक करताहेत पाठराखण...


निलेश जांबले दौंड-पुणे

दौंड तालुक्यातील रोटी या गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवकी संतोष शितोळे व तिचे  कुटुंबीय हे रोटी गावातील शासकीय गट नंबर 287 मध्ये गायरान जागेमध्ये अतिक्रमण करून पक्के बांधकाम करत आहेत... मात्र या ग्रामपंचायत सदस्य विरोधामध्ये कोणी आवाज उठवण्यास तयार होत नाही सदर कुटुंब हे इतर कुटुंबास त्रास देण्याच्या भितीपोटी कोणीही गावातील कोणताही व्यक्ती त्याच्याबद्दल भ्र शब्द काढत नाही तर कोणी तक्रार करण्याचे धाडस करत नाही. मात्र याप्रश्नी गावचे ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधला असता सदर कुटुंब हे गायरान जागेतच बांधकाम करत असून ती जागा गेली कित्येक वर्षापासून ते वापरत होते असे सांगतात तर सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता माहिती घेऊ असे सांगून अवैध बांधकाम करण्यास बळ देत असल्याचे दिसून येते.... तर 30 बाय 40 या जागेवर पक्के आर सी सी बांधकाम गावातील गोरगरीब जनतेला दबावाखाली घेत मोठ्या दिमाखात सुरू आहे मात्र कारवाई शून्य आहे...

 याप्रश्‍नी दोन पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अमर माने यांच्याशी संपर्क साधला असता फक्त कारवाई करून बघू असे सांगण्यात येत आहे त्यामुळे गटविकास अधिकारी व अतिक्रमण करून बांधकाम करणारे गावगुंड पुढारी त्यांचे आर्थिक तडजोड झाल्याचे गावामध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे...

Post a comment

0 Comments