नवगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजना कामाची होणार चौकशी , विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश


पैठण.प्रतिनिधी.विजय खडसन:—
पैठण तालुक्यातील मौजे नवगांव येथे सन 2011 ला 3 कोटी रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असुन या योजनेचे काम औरंगाबाद येथील जयश्री कन्ट्रक्शन कंपनी मार्फत केले जात आहे.अंदाज पत्रकात दर्शविल्या प्रमाणे हे काम 18 महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असतांना सद्यस्थितीत काम अपुर्ण असुन आजपर्यंत या योजनेवर  2  कोटी रु खर्च केला म्हणून दाखविण्यात आले परंतु प्रत्यक्षात काम मात्र तेवढं केलेलं दिसून येत नसुन झालेले काम पूर्णपणे निकृष्ट व अपूर्ण झालेले आहे. संबंधीत ठेकेदाराने अधिकार्यांना हाताशी धरून नियमांचे उल्लंघन करत बोगस कामाची बिले उचलून घेतली असल्याचा आरोप नवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ.सौ.नाहिदा गुलदाद पठाण यांनी दि.21जुलै 2020 रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केला असुन याची विभागीय चौकशी करून यात दोषी आढळणाऱ्यांंवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नवगाव ग्रामपंचायत चे सरपंच डॉ.सौ नाहिदा गुलदाद पठाण यांनी केली आहे.
निवेदनिची तातडीने दखल घेऊन विभागीय  आयुक्तांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिल्यामुळे योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. 

डॉ नाहिदा गुलदाद पठाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  2015 मध्ये ग्रामसभेतुन अध्यक्ष , व सचिव यांची देख रेख कमिटी केली आणि सरपंच पदसिद्ध अध्यक्ष असताना वरील समितीच्या कडे कारभार देण्यात आला.त्यानुसार समितीकडे याबाबत सविस्तर चर्चा करून नवगाव येथे होत असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अंदाजपत्रकानुसार न करता ठेकेदाराच्या मर्जी प्रमाणे निकृष्ट व बोगस काम केले जात आहे या समितीच्या देखरेखीखाली होत असल्याने चांगले दर्जेदार काम करुन घेणे आपली जबाबदारी आहे.परंतु समितीने सुध्दा संबंधीत ठेकेदारा बरोबर संगनमत करून नियमाच्या बाहेर काम करून बोगस बिले उचलून घेतली असल्याने याची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दि.21जुलै 2020 रोजी विभागीय आयुक्तांकडे करताच डॉ.नाहिदा पठाण यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे तक्रारीतील मुद्दयांची वस्तुनिष्ठ चौकशी करुन अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा असे लेखी पत्र दि.4/8/2020 रोजी दिले आहे.दिलेल्या निवेदनानुसार चौकशी होणार असल्याने नवगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या काम भ्रष्टाचार करणाऱ्यांं ठेकेदारांसह व या कामात ठेकेदारासोबत संगनमत करणाऱ्यांंचे चांगलेच धाबे दणाणले असुन या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांंवर काय कायदेशीर कार्यवाही होणार याकडे  गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a comment

0 Comments