रायगड पोलीस दलातील अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू , होम डीवायएसपी राजेंद्रकुमार परदेशी यांचे उपचारा दरम्यान निधन


प्रतिनिधी :- सुरेश शिंदे 

रायगड 
अलिबाग - रायगड पोलीस दलातील अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झालाय . राजेंद्रकुमार परदेशी असं त्यांचं नाव असून ते रायगड पोलीस दलात गृह पोलीस     उपअधीक्षक म्हणजे होम डी वाय एस पी या पदावर कार्यरत होते . परदेशी याना कोरोनाची लागण झाल्याने 9 सप्टेंबर पासून त्यांच्यावर नवी मुंबईतील डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते . रात्री उशिरा त्यांचे निधन झाले . गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात ते रायगड पोलीस दलात रुजू झाले . 1993 पासून पोलीस उपनिरीक्षक , सहायक पोलिस निरीक्षक , पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे . रायगडसह नाशिक , पुणे , सिंधुदुर्ग , मुंबई , नागपूर , सातारा येथे त्यांनी सेवा बजावली आहे .आतापर्यंत रायगड पोलीस दलातील जवळपास 400 हुन अधिक कर्मचारी , अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे . त्यात तीन कर्मचारी व एका अधिकाऱ्याचा समावेश आहे .

Post a comment

0 Comments