शेवगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करा - नवनाथ इसारवाडे


अहमदनगर .
शेवगाव तालुक्यात आॅगस्ट व सप्टेंबर महिण्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकर्‍यांची पिके जमिनदोस्त झाले आहेत.त्यामुळे अधिच दुस्काळाने होरपळुन निघालेला शेतकरी ,कोरोनाने त्रस्त झालाय आणि आता या अतीवृष्टीने शेतकर्‍याचे पारच कंबारडे मोडले आहे.त्यामुळे शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष श्री नवनाथ इसारवाडे यांनी मा. तहसिलदार शेवगाव यांना लेखी निवेदन दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की शेतकर्‍यांचे सर्वच पिके आतीवृष्टीमुळे जलमग्न झाले आहेत.सडले आहेत बाजरी,तूर,सोयाबीन,कपाशी,उडिद,ृऊस तसेच फळ बागायती पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.तरी लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपापाई मिळावी यासाठी लेखी निवेदन शिवसंग्राम पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.संबधीत पत्राची प्रत मा. आमदार श्री विनायक मेटे ,मा. मुख्यमंत्री महोदय तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. असे नवनाथ इसारवाडे यांनी सांगीतले.

Post a comment

0 Comments