केडगाव चौफुला येथे भाजपाच्या वतीने बोंबाबोंब ...


निलेश जांबले दौंड-पुणे


आज मराठा आरक्षण स्थगिती महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता न आल्याने दौंड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने केडगाव चौफुला येथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले प्रशासनास निवेदन देऊन राज्य सरकारने त्वरीत अध्यादेश काढून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राज्यातील सरकारने मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे त्यामुळे 9 सप्टेंबर हा मराठा समाजाला काळा दिवस आहे तसेच राज्यातील सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छित नाही हे सरकार मराठा समाजाच्या विरोधात आहे अशी प्रतिक्रिया किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे....माऊली शेळके राजाभाऊ तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त करत राज्य सरकार व जोरदार टीका करत घोषणाबाजी करण्यात आली....

आज दौंड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने केडगाव चौफुला या ठिकाणी मराठा आरक्षण स्थगिती आणि विकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणटिकविता न आल्याने निष्क्रिय सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला... यावेळी प्रदेश सरचिटणीस किसान मोर्चा चे वासुदेव काळे  तसेच राजाभाऊ तांबे  माऊली शेळके  आदी पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात मनोगत व्यक्त केली यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली....
यावेळी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे ,  भाजपाचे दौंड तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ताकवणे , राजाराम तांबे ,  गणेश आखाडे संघटक, नामदेव बारवकर, तानाजी दिवेकर सरचिटणीस भाजपा पुणे जिल्हा,    ज्ञानेश्वर शेळके, यांसह मान्यवर उपस्थित होते...

Post a comment

0 Comments