ॲट्रॉसिटी प्रकरणांचा तपास, कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करावी- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


औरंगाबाद,दि. 28  - अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांचा तपास आणि कायदेशीर प्रक्रिया योग्यरित्या तत्परतेने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, खासदार इम्त‍ियाज जलिल, आमदार अतुल सावे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, समाज कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी, विभाग प्रतिनिधी उपस्थित होते. 
अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 व सुधारीत अधिनियम 1995 च्या अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये प्रथम माहिती अहवाल दाखल झाल्यानंतर पिडीतांना कायद्यातील तरतूदीनुसार अर्थसहाय्य तत्परतेने उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 व सुधारीत अधिनियम 1995 अंतर्गत 1 ते 31 ऑगस्ट या महिन्यात जिल्ह्यातील शहर भागात 02, ग्रामीण भागात 05 अशा एकूण 07 गुन्ह्यांची  नोंद करण्यात आली असून त्या प्रकरणांच्या तपासाबाबतदेखील जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांचीदेखील दखल घेतली. 
******

Post a comment

0 Comments