जिओ चे टॉवर बनले शोभेची वस्तू


गंगापुर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
गंगापूर शहर व तालुक्यात जिओचे टॉवर बनले शोभेच्या वस्तू जिओ कंपनीच्या सिमकार्डला गेल्या दोन महीण्यापासुन कव्हरेज मिळत नसल्याने ग्राहक पुर्ण वैतागले आहे जिओच्या कंपनीने लक्ष देत  ग्राहकांच्या सिमकार्ड ला कव्हरेज देण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे

देशात कोरोनाने  धुमाकूळ घातला असून तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व खाजगी शाळा व महाविद्यालय यांनी ऑनलाइन
शिक्षणाचा प्रयोग सुरु केला आहे.त्याच प्रमाणे जिओच्या कंपनीने ग्राहकांना विविध अमीषे दाखवीत ग्राहकांना आकर्षित करत जिओ सिमकार्डचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले आहे मात्र गेल्या तीन महीण्यापासुन सतत जिओच्या सिमकार्ड असलेल्या मोबाईल ग्राहकांना गंगापूर शहर व तालुक्यात कव्हरेज मिळत नसल्याने जिओचे टॉवर शोभेच्या वस्तू बनल्याने ग्राहक वैतागले असुन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे 
जिओच्या सिमकार्ड बंद करून इतर कंपण्याचे सिमकार्ड खरेदी करत आहे जिओच्या कंपनीने लक्ष देत ग्राहकांना चोवीस तास कव्हरेज देण्याची मागणी ग्राहकाकडून करण्यात येत आहेत

Post a comment

0 Comments