जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली बिल्डा येथील ई-पीक प्रकल्प पाहणी

                           
औरंगाबाद - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बिल्डा येथील रामदास मूळे यांच्या शेतात जाऊन ई - पीक प्रकल्प पाहणी केली. 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप जाधवर,  उपविभागीय अधीकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय कृषी अधीकारी पी. आर . जाधव ,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  तुकाराम मोटे,जिल्हा तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव , आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण  यांनी ई- पीक पाहणी या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अप्लिकेशन द्वारे पिकांची नोंदी घेण्याचे शेती बांधावर प्रात्यक्षिक करून कामकाजाची पाहणी केली.  यावेळी उपस्थित सरपंच व शेतकरी बांधवाना संपूर्ण गावातील ई- पिक पाहणीचे काम पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले,तसेच बिल्डा गावचे तलाठी यांनी संबंधित शेतकरी यांच्या उपस्थितीत ई- पीक पाहणी मोबाईल अप्लिकेश मध्ये उभ्या पिकांची माहीत भरून Geotagged फ़ोटो अपलोड केले.

Post a comment

0 Comments