भारतीय जनता पार्टीच्या पैठण शहराध्यक्ष पदी चंद्रशेखर पाटील यांची नियुक्ती


पैठण ( विजय खडसन )-

पैठण भारतीय जनता पार्टीच्या पैठण शहराध्यक्ष पदी चंद्रशेखर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. . श्री चंद्रकांत दादा पाटील,  श्री रावसाहेब पाटील दानवे, खा भागवत कराड  . श्री भाऊरावजी देशमुख, मा. श्री विजय औताडे यांच्या मार्गदर्शनानुसार चंद्रशेखर पाटील यांच्या पक्ष कार्याची दखल घेऊन आज त्यांची नियुक्त पैठण शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पैठण शहरात त्यांच्यावर सुभेच्छाचा वर्षाव होत असून कार्यकर्त्यां मध्ये एक नवा उत्साह पहावयास मिळाला. याप्रसंगी पत्रकार परिषद मध्ये पैठणचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा.श्री डॉ. सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पैठण तालुका व पैठण शहराची कार्यकारणी जाहीर केली.
याप्रसंगी पत्रकार परिषदे मध्ये उपस्थित डॉ. सुनील पा.शिंदे, भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष मा.श्री चंद्रशेखर पाटील नवनिर्वाचित तालुक्याचे सरचिटणीस विजय चाटूपळे, संघटन सरचिटणीस भाऊसाहेब बोरुडे, राम तांगडे इत्यादी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते

Post a comment

0 Comments