क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानतर्फे ७८ वा महाडचा हुतात्मा दिन साजरा
प्रतिनिधी:- सुरेश शिंदे रायगड

 रायगड महाड :- क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानच्यावतीने शहिद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी १० सप्टेंबर या महाडच्या हुतात्मा दिनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

ज्या महाडमध्ये देशाच्या समग्र स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी सर्वात आधी पडली ती थोर स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पुरोहित यांच्यामुळे आणि याच महाडमध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नावे सुरु करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमार्फत ७८ वर्षांपूर्वी महाडची मामलेदार कचेरी ताब्यात घेण्यासाठी नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या किसान मोर्च्यात शहिद झालेल्या पाच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या छोटेखानी कार्यक्रमाची सुरवात अध्यक्ष रोहित पाटील यांच्याहस्ते प्रतिष्ठानचे कार्यालय येथे नानासाहेब पुरोहित यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाली. 

त्यानंतर शिवाजी चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानवंदना अर्पण करुन शहिद क्रांतिपुत्रांना अभिवादन करित त्यांच्या आहुतीच्या स्थळी जाऊन क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित पाटील, निरज चौधरी, प्रदीप लोते, सचिन वडके तसेच सेवानिवृत्त बीडीओ रमेश गुजर आदि सदस्यांनी हुतात्मा नथू टेकावला, हुतात्मा अर्जून भोई, हुतात्मा वसंत दाते आणि हुतात्मा कमलाकर दांडेकर यांच्या नामफलकांना पुष्पमाला अर्पण केली.

शिवाजी चौक येथून निघालेली ही छोटेखानी रॅॅली चवदार तळे येथे संपविण्यात आली.

Post a comment

0 Comments