माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची वैजापुरात आ.बोरणारेंच्या हस्ते सुरवातवैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्यां संकल्पनेतून सुरू झालेल्या माझें कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात वैजापुर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात वैजापुरचे आमदार प्रा रमेश बोरणारे यांनी स्वतःची व शिवसेना  उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप व उपविभागीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तहसीलदार यांनीही स्वतःची थर्मामीटर द्वारे तपासणी करून सुरवात केली. यावेळी तालुक्यात एकुण २३३ सदस्यांच्या  टिम कार्यरत करून ग्रामीण भागात २२१ तर वैजापुर शहरात १२ टिम कार्यरत करण्यात आली असून ह्या टिमवर आरोग्य अधिकारी यांचे लक्ष्य राहणार असून त्यांच्या निगराणीखाली ही टिम कार्यरत राहणार आहे.याप्रसंगी आ.बोरणारे यांनी या सर्व कामकाजाचा आढावा घेतला व परिसरातील नागरिकांनी या आरोग्य टिमला सहकार्य करून गावातील प्रत्येक कुटूंब माझे कुटुंब माझी जबाबदारी समजून आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेऊन आपल्या कुटुंबातील कोणालाही कोरोना होऊ नये यासाठी सर्वांनी मास्क लावने, सॅनेटाइजर वापरणे, साबणाने हात धुणे, सुरक्षित अंतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन आमदार प्रा रमेश बोरणारे, उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार निखिल धुळधर, गटविकास अधिकारी मोकाटे, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप आदीच्या उपस्थितीत करण्यात आले.

Post a comment

0 Comments