माणगाव तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन सादर


माणगाव - तालुका प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दि. ०७/०९/२०२० रोजी 
मा. तहसिलदार सो. माणगाव, 
मा. गटविकास अधिकारी सो. पंचायत समिती कार्यालय माणगाव, 
मा. गटशिक्षण अधिकारी सो. पंचायत समिती माणगाव, 
मा. पोलिस निरीक्षक सो. पोलिस ठाणे माणगाव 
यांना संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सादर केले. 

संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दि. २९/०८/२०२०रोजी पार पडली त्या बैठकीत ठराव क्रमांक ३ च्या अनुशंगाने खालील प्रलंबित मागण्यांसाठी ठराव करण्यात आला. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष वेधावे व आता चालु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रशासनाने आमच्या मागण्या विधीमंडळात मांडाव्यात असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

मागण्या:

१)१नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 
आ. दि. १नोव्हेंबर २००५नंतर सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचार्‍यांचा अपघाती /नैसर्गिक मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबीयांनी १० लाखाची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी. दिनांक २९संप्टेबर२०१८ चा शासन निर्णय रद्द करावा. 

२) जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक /माध्यमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी ७ व्या वेतन आयोगा प्रमाणे नवीन लाभाची सुधारीत आश्वासीत प्रगत योजना (१०:२०:३०)प्रमाणे लागु करावी. 

३)विस्तार अधिकारी (शिक्षण)केंद्रप्रमुख पदे अभवितपणे शिक्षकांमधुन भरण्यात यावी 

४)कँशलेश विमा योजना लागू करावी. 

५)जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने प्रदान करावीत. 

६)कोव्हिड १९ चे कर्तव्य बजावतांना ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ५०लाख विमा संरक्षण अनुदान मिळावे. 

७)प्राथमिक शिक्षकांच्या २७/०२/२०१७ चा शासन निर्णयानुसार जिल्ह्यांतर्गत विनंती बदल्या आँनलाईन करण्यात याव्या. 
 
तरी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची शासनाने दखल घेऊन प्रश्नांची सोडवणूक करुन शिक्षकांना दिलासा द्यावा.
 
सदर निवेदन सादर करते वेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद रायगड चे जिल्हा अध्यक्ष संजय निजापकर, कोकण विभाग प्रतिनिधी संदिप शिंदे सर, राज्य प्रसिद्धी प्रमुख रविकिरण पालवे, रायगड जिल्हा कार्यालयीन चिटणीस जितेंद्र बोडके, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव सर, तालुका अध्यक्ष गणेश निजापकर, तालुका कार्यवाहक सुजित भोजने, तालुका कार्याध्यक्ष मनोज नाइकडे, तालुका कोषाध्यक्ष सतिश ढेपे, तालुका कार्यालयीन चिटणीस रत्नदीप चाफे, माणगाव शिक्षक पतपेढी माजी अध्यक्ष संजय पाटोळे, तालुका संघटक- सुरेश शिरसाट तसेच संघटनेचे सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

प्रतिनिधी:रिजवान मुकादम सह मराठा तेज ब्युरो माणगाव, रायगड

Post a comment

0 Comments