आगलावे गेवराई येथून राहत्या घरातून तरुण बेपत्तापैठण (प्रतिनिधी विजय खडसन )-

 पैठण तालुक्यातील आगलावे गेवराई येथून राहत्या घरातून तरुण दि.१८ रोजी सातच्या दरम्यान निघून गेला आहे.नारायण बापू आगळे (वय२८,वर्ष, रा. आगलावे गेवराई,ता.पैठण) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण आगळे यांच्याकडून पाचोड ता.पैठण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नारायण हा दि.१८ रोजी सातच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे. चेहरा गोल, रंग सावळा, उंची पाच फूट, शरीराने सडपातळ, मिशा राखलेल्या असून, पांढ-या रंगाचा शर्ट,निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, पायात काही घातलेला नाही. याचे शिक्षण चौथी पर्यत झालेले असुन यांच्या डावा पाय फ्कँचर असल्यामुळे लंघडत चाल आहे. त्याच्याजवळ मोबाईल आहे. वरील वर्णनाच्या तरुणा विषयी काही माहिती मिळाल्यास संबंधितांनी तात्काळ पचोड पोलीस ठाणे मध्ये संपर्क साधून या तरुणा ची माहिती पोलिसांना देण्यात यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments