राहुल कुल ठरले प्लाझ्मा दान करणारे पहिलेच आमदार


(निलेश जांबले )

दौंड-पुणे
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल नुकतेच कोरोनामुक्त झाले आणि बरे होताच त्यांनी तालुक्यातील प्रशासकीय कामाचा आढावा घेत कोरोना संकट दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत,नुकतेच आमदार राहुल कुल यांनी प्रादेशिक रक्तपेढी- ससून सर्वोपचार रुग्णालय येथे जाऊन प्लाझ्मा दान केले आहे,दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे राज्यातील पहिलेच प्लाझ्मा दान करणारे आमदार ठरले आहेत.

कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे परंतु रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मादाते यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे,कोरोना विरुद्धचा लढाईला अधिक बळकटी मिळावी यासाठी प्रत्येक कोरोना मुक्त नागरिकाने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे असे आवाहन करत एकमेकांच्या साथीनेच आपण या संकटावर मात करू शकतो असे राहुल कुल यांनी सांगितले आहे,दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे राज्यातील पहिले प्लाझ्मा दान करणारे आमदार ठरले आहेत आमदार राहुल कुल यांनी समाजापुढे नवा आदर्श घालून दिला असून कोरोनातून बरे झालेले मंत्री व आमदार याचा आदर्श घेणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.आमदार राहुल कूल यांच्या  कुटुंबातील सर्वच सदस्य नुकतेच कोरोना मुक्त झाले असून आमदार कूल यांच्या पत्नी कांचन कूल यांनी देखीक प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला आहे

Post a comment

0 Comments