पैठण (विजय खडसन)
पैठण तालुक्यातील अतिवृष्टी व वादळी वार्यामुळे पैठण तालुक्यातील अनेक गावांमध्ये खरीप पीक तसेच फळबागांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालिदल झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शेतकर्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पैठण तालुकाध्यक्षा अनिता वानखडे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यात पंधरा दिवसापासून सतत वादळी वार्यामुळे तालुक्यातील ढाकेफळ, विहामांडवा,आपेगांव,हिरडपूरी,नांदर, विहामांडवा,नवगांव, लोहगाव, चांगतपूरी यासह आदी गावांमध्ये ऊस,मोसंबी पिक तसेच कापूस, या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शासन निर्णयानुसार आपत्ती व्ययस्थापन अंतर्गत पैठण तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना नुुकसान भरपाई देण्याची मागणी. अनिता वानखेडे ,यांनी केेली आहे.
0 Comments